Ravan pithale-रावण पिठले Recipe
how to make ravan pithle |
नमस्कार मंडळी......
आज रावण पिठले केले...झालं असं.. की आम्हा उभयतांना काही तरी झणझणीत खायची इच्छा झाली... झटपट झाले.
- १ मोठा कांदा उभा चिरुन घेतला.
- ६ ते ७ लसूण पाकळ्या बारीक चिरल्या.
- १ चमचा बेसन चांगले ५ वाट्या पाण्यात कालवले.
- जेवढे बेसन घेतले.. तेवढेच तिखट घेतले.( बेडगी मिरचीचे तिखट वापरले.).
- एका कढईत जरा सढळ हस्ते तेल घातले.
- त्यात मोहरी १ चमचा जिरे १/२ चमचा घातले.
- .मग कांदा आणि लसूण लालसर परतले.
- मग गॅस बंद करुन त्यात १/४ चमचा हिंग १/२ चमचा हळद घातली..
- लगेचच १ चमचा (ज्या चमच्याने बेसन घेतले.. तोच चमचा भरुन तिखट) तिखट घातले...
- नीट मिक्स केल्यावर गॅस परत सुरु केला.
- मग बेसन घातले.
- नीट हलवत राहिले साधारण ५ ते ७ मि.. मग चवीनुसार मीठ घातले आणि झाकण ठेवून १० मि. वाफ काढली... पिठलं झाल्यावर कढईच्या कडेने तेल सुटले.
गरमागरम भात किंवा तव्यावरची भाकरीसोबत जे लागते.त्याचे वर्णन केवळ अशक्यच.
करताय न म रावण पिठले.
करा ...खा... आणि कंमेंट करायला विसरू नका .
Comments
Post a Comment