Healthy snacks : Healthy Office Snack Option


 Healthy snacks : Healthy Office  Snack Option





Image result for healthy snacks images free download
Healthy snacks : Healthy Office  Snack Option

 Healthy snacks : Healthy Office  Snack Option



               सध्याच्या धावपळीच्या जीवनात ऑफिस मध्ये काम करणाऱ्या लोकांना स्वतःच्या तब्बेतीकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नाही . त्यामुळेच ते विविध रोगांनी ग्रासलेले असतात .  म्हणुणच वेळ नसतो तेव्हा लवकरात लवकर डब्यात भरून नेता येणारे काही ऑफिस स्नॅक्स खालीलप्रमाणे आहेत


   भाजलेला चणा:

              सर्वोत्तम प्रथिनेयुक्त स्नॅक्सपैकी एक म्हणजे भाजलेला चना. ते आपल्याला खूप प्रोटीन आणि फायबर (fibre ) देतात ज्यामुळे आपली भूक कमी होते . शिवाय, ऑफिसच्या वेळेस ते खाणे एकदम सोपे असते .

               भाजलेला चणा म्हणजे असा एक  नाश्ता आहे . जो आपले वजन कमी करण्यासाठी आहारात सहजपणे जोडला जाऊ शकतो.  भाजलेले चणा केवळ वजन व्यवस्थापित करण्यास मदत करत नाहीत तर आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर गुणधर्मांसह देखील भरलेले असतात. हे वजन कमी करण्यासाठी एक योग्य स्नॅक आहे .

Image result for healthy snacks images free download bhuna chana
Healthy snacks : Healthy Office  Snack Option

    

 मखाना ऑफिस स्नॅक


              मखाणा म्हणजे दुसरे काहीही नसून भाजलेल्या कमळांच्या बिया होय  आणि त्यांची पॉपकॉर्न सारखीच चव असते . वजन कमी करण्यासाठी माखाना ऑफिस स्नॅक्सचा उत्तम पर्याय आहे.


             मखानामध्ये कॅलरी कमी असतात , म्हणूनच ते संध्याकाळी वजन कमी स्नॅक्स म्हणून लोकप्रिय झाले आहे, जे आपण आनंदाने खाऊ शकता. 50 ग्रॅम भाजलेया मखाने मध्ये 180 कॅलरी असतात आणि शरीरात त्यामुळे कोणतेही  चरबी जमा होत नाही . 




Image result for healthy snacks images free download roasted makhana
Healthy snacks : Healthy Office  Snack Option: roasted makhana


ड्राय फ्रुटस (dry fruits)


                ड्राय फ्रुटस हे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे . शिवाय ते ऑफिस मध्ये खाण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे . काजू, बदाम ,अक्रोड ,मनुका यासारखे ड्राय फ्रुटस आपण सहजपणे ऑफिस बॅग मध्ये किंवा शर्ट अथवा पंत च्या खिशामध्ये आपण नेऊ शकतो .


Image result for healthy snacks images free download  dry fruits
Healthy snacks : Healthy Office  Snack Option: dry fruits 

भाजलेल्या शेंगदाने (roasted peanuts )



                       शेंगदाणे यात चरबी आणि कॅलरीज उच्च प्रमाणात असूनही, शेंगदाणे खरंच वजन कमी करण्यास उपयुक्त आहेत . शेंगदाणे फायबर, प्रथिने आणि पोषक तत्वांनी भरलेले असतात जे वजन कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात .

                     म्हणून, आपल्या आहारात एक पौष्टिक अन्न  म्हणून शेंगदाणा किंवा शेंगदाणा बटर समाविष्ट करणे योग्य आहे . प्रत्येकाने रोज मूठभर शेंगदाणे  किंवा शेंगदाणा बटरचे सेवन रोजच्या आहारात करावे .
 
          


Image result for healthy snacks images free download roasted peanuts
Healthy snacks : Healthy Office  Snack Option: roasted peanuts 



फळं (fruits )


                    हंगामी( seasonal ) फळ हे आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांचे उत्कृष्ट स्रोत आहेत आणि त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे. फळे आणि भाज्या जास्त प्रमाणात आहार घेतल्यास एखाद्या व्यक्तीस हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.

                    फळ खाल्ल्यास रोगाचा धोका कमी होतो . फळांमधील  व्हिटॅमिन सी कोलेजेन तयार करण्यासाठी आवश्यक आहे जे त्वचेला पुरवणार्या कोशिका मजबूत करते.



Image result for healthy snacks images free download fruits
Healthy snacks : Healthy Office  Snack Option: seasonal fruits   






Comments