चवीला अत्यंत छान आणि पौष्टिक असा हा डोसा / धिरडी नाष्टा

 

(mixed pulses and cereals dosa)चवीला अत्यंत छान आणि पौष्टिक असा हा डोसा / धिरडी   नाष्टा :


(mixed pulses and cereals dosa) how to make dasa from pulses and cereals at home
(mixed pulses and cereals dosa)

 

   आज  घरच्या घरी करता येईल असा, मुलांना आवडेल असा एक छान पदार्थ तुमच्या सोबत मी share करत आहे.
             आपल्या सगळ्यांच्या घरात भाजीसोबत कायम असणारी वस्तु म्हणजे कडधान्ये.... याच कडधान्यांच्या वापर करून छान अशी धिरडी बनविता येतात. जी काही प्रमाणात डोश्याच्या प्रकाराची असतात. ह्याला आपण "SPROUTS डोसा" असे नाव देऊया.

चवीला अत्यंत छान आणि पौष्टिक असा हा डोसा / धिरडी नाष्टा किंवा जेवण्यासाठी सुद्धा चालेल.
(mixed pulses and cereals dosa) how to make dasa from pulses and cereals at home
(mixed pulses and cereals dosa)

साहित्य :-

* सगळ्या प्रकारची कडधान्ये १ छोटी वाटी.
१. मटकी
२. मसूर
३. हिरवे मूग
४. पांढरे किंवा हिरवे वाटाणे (उपलब्ध असतील तर दोन्ही वापरू शकता)
५. चवळी
६. कडवे वाल

(टीप - उपलब्ध असल्यास बाकीची सुद्धा वापरु शकता. काबुली चणे / छोले पचनास जड असल्यामुळे मी वापरले नाहीत, तरी आवड असल्यास ते सुद्धा वापरु शकता. )

साहित्य 


* १ छोटी वाटी तांदूळ
* १ छोटी वाटी हरभरा / चणा डाळ
* १ छोटी वाटी मुगाची डाळ
* ३-४ हिरव्या मिरच्या / आवडीनुसार लाल तिखट
* थोडेसे किसलेले आले
* मीठ
* तेल

कृती:-


  • सगळ्यात आधी सर्व कडधान्ये ३-४ वेळेस पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. आणि किमान २४ तास भिजत घालावीत.
  • भिजत घातल्यानंतर १२ तासाने त्यातील पाणी बदलून त्यात तांदूळ, मुगाची डाळ व हरभरा / चणा डाळ भिजत घालणे.
  • २४ तासांनी त्यातील सर्व पाणी काढून घेऊन एका चाळणीत ती काढावीत. परत एकदा पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊन ती mixer मधून त्यात मिरची (मिरची नको असल्यास लाल तिखट चालेल) आणि आले घालून पेस्ट प्रमाणे बारीक करावी. डोश्याचे पीठ ज्या प्रमाणात म्हणजेच जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही असे असावे.
  • ही मिश्रण ३ तास झाकून ठेवावे. सध्या ऊन असल्याने ते थोड्या वेळात सुद्धा छान तयार होते.
  • आपल्या चवीनुसार मीठ घालावे. मिश्रण घट्ट वाटत असल्यास थोडेच पाणी घालून मिश्रण एकजीव करावे.
  • नॉन-स्टिक तवा घेऊन किमान ३-४ मिनिटे तो तापवणे. त्यावर एक चमचा तेल घालून एक डाव मिश्रण सम प्रमाणात पसरून घेणे. कडेने थोडे तेल सोडा.
  • २ मिनिटे झाली की धिरडे उलथण्याने पालटून दुसर्‍या बाजूने सुद्धा छान शिजवून घ्यावे. 
  • पुढचे धिरडे घालताना तेल लावू नये, नाहीतर ते चिकटते आणि तुटते. धिरडे घातल्यानंतरच कडेने तेल सोडावे. 
(mixed pulses and cereals dosa) how to make dasa from pulses and cereals at home
(mixed pulses and cereals dosa)

ही धिरडी तुम्ही सॉस / चटणी सोबत देऊ शकता. किंवा नुसती सुद्धा छान लागतात.
नक्की करून बघा. आणि सांगा कशी होतात ते.

mixed pulses and cereals dosa,how to make dasa from pulses and cereals at home
(mixed pulses and cereals dosa)


mixed pulses and cereals dosa , how to make dasa from pulses and cereals at home
(mixed pulses and cereals dosa)

Comments